निगुडे रस्त्याच्या कामाला कंत्राटदार लावतो चुना..? | ग्रामस्थांनी बंद पाडलं काम

बांदा : शेर्ला – निगूडे रस्त्याचं खडीकरणाचं काम सुरु आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप सुरवातीपासूनच ग्रामस्थ करत आहेत. काल कोणत्याही निकषाची पूर्तता ण करता खडीकरणाचं काम सुरु होत. काम सुरु असताना ग्रामस्थांनी अचानक भेट देत काम निकृष्ट दर्जाचं सुरु असल्याच दिसताच हे काम ग्रामस्थांनी रोखलं.

जुनाट डांबर न काढता ठेकेदार तसेच खडीकरण करत होता. ग्रामस्थांना मिळालेल्या माहितीनुसार कागदोपत्री तसे प्रथम असलेले डांबरीकरण काडून नंतर नवीन खडीकरण करणे असे नमूद केले आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी रणसुर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून हि बाब त्यांच्या निदर्शनास आणली. हे काम सुरु असताना कोणताही अधिकारी तिथ उपस्थित नव्हता.

यावेळी माजी सरपंच समीर गावडे, माजी सरपंच आत्माराम गावडे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गावडे, उपसरपंच गौतम जाधव, किशोर जाधव आदी उपस्थित होते.