सावधान..! बुरखा घालून महिला वेशात फिरणारी टोळी सक्रिय | देवगड तालुक्यातील मुणगेत घडली घटना

161

देवगड : तालुक्यातील मुणगे येथे मसाल्याचे पाणी फेकून लुटण्याचा प्रयत्न तिघांच्या टोळीने केला. पैकी एका संशयिता ला ताब्यात घेण्यात यश आले आहे. हा प्रकार मूणगे येथील एका नागरिकाच्या डोळ्यात मसाल्याचे पाणी फेकण्याचा प्रयत्न तिघांनी केला. मात्र तो सावध होऊन आरडाओरडा करू लागला. यामुळे ते तिघे पळून गेले. आलेले हे तिघेही महिलेचा ड्रेस व बुरखा वापरत आहेत.

यापैकी एक संशयित मुलगी येथील समुद्रकिनाऱ्यावर बसल्याचे दिसली. अधिक चौकशी करता त्याला समाधानकारक उत्तरे देता येत नसल्याने नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील चौकशी सुरू आहे.

देवगड तालुक्यातील वाडा येथेही अशाच प्रकारची घटना घडल्याने आता पोलीस यंत्रणा सावध झाली आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू असून नेमका काय प्रकार आहे याचा लवकरच उलगडा करण्यात येणार आहे.