संगणक प्रशिक्षण काळाची गरज | ओरोस बुद्रुक नं १ या प्रशालेत संगणक वर्ग सुरू

310

सिंधुदुर्ग : ग्लोबल फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांमध्ये संगणक कार्यशाळा राबविण्यात येतात. अद्यावत संगणक शिक्षण देणे व विविध प्रकारची आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. त्याचाच एक भाग म्हणून ओरोस बुद्रुक नं १ या प्रशालेत संगणक वर्ग सुरू करण्यात आले.

या मोफत प्रशिक्षणाचा शुभारंभ २३/०३/२३ ला झाला. ५ वी. ते ७ वी. मधील ४४ मुलांनी यात सहभाग घेतला.

ग्लोबलचे स्वप्निल नाईक यांनी या कालावधी दरम्यान मुलांना मार्गदर्शन केले. साधारणपणे १०/०४/२०२३ पर्यंत हे प्रशिक्षण देण्यात आले. मोबाईलच्या भ्रामक जगात अशाप्रकारे प्रशिक्षण ही एक काळाची गरज आहे. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी शालेय शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

ग्लोबलचे व्यवस्थापक श्री. परब यांनी संस्थेचे विविध उपक्रम व या काळामध्ये संगणक प्रशिक्षणाचे महत्व विशद केले. दरम्यान प्रशिक्षणाबद्दल मुलांनी आपले मत व मिळवलेल्या ज्ञानाचा उलगडा केला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मुंडले तसेच उपक्रमशील शिक्षीका रिया आळवेकर यांनी ग्लोबलने आयोजित केलेल्या संगणक कार्यशाळेबद्दल आभार व्यक्त केले.