रायगड : रायगड जिल्ह्यातील जुना मुंबई – पुणे मार्गावर खोपोली येथे भीषण अपघात झाला आहे .जुना पुणे मुंबई हायवे, शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये एक खाजगी बस दरीमध्ये कोसळलेली आहे. यामध्ये ४५ प्रवाशी होते. यातील सात प्रवासी मयत झाल्याचे व २० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या अपघातानंतर दरीमध्ये उतरून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.घटनास्थळावर अपघातग्रस्ताच्या मदतीला पोलीस , हायकर्स ग्रुप, आयआरबी टिम तसेच स्थानिक ग्रामस्थ बचाव कार्य करत आहेत.

अपघात मोठा असून, रुग्णांवर तात्काळ उपचार होण्यासाठी खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.

या अपघातग्रस्त बस मध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव(मुंबई) चे सदस्य प्रवास करत होते, अशी माहिती मिळत आहे. पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात असताना हा अपघात झाला आहे.





