आरोंद्यात स्थानिक मच्छीमारांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या होड्या पकडल्या…!

सावंतवाडी : आरोंदा शिपेतुवाडी येथे स्थानिक मच्छीमार ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार होड्या पकडून महसूलच्या ताब्यात दिल्या. तेरेखोल खाडीपात्रातील आरोंदा किरणपाणी येथे गोव्यातील वाळू माफियांकडून महाराष्ट्र हद्दीलगत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

काही दिवसापूर्वी महसूल विभाग कडून अशा अवैध वाळू उपसा करणाऱ्यासा होड्यांवर कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच आजपहाटे तीनच्या सुमारास आरोंदा शिपेतुवाडी येथील स्थानिक मच्छिमार ग्रामस्थांनी गोव्यातील महाराष्ट्र किनाऱ्यालगत अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्या चार होड्या व त्यावरील आठ कामगारांना पकडून महसूल विभागच्या ताब्यात दिले.

यानंतर नायब तहसीलदार मुसळे यांनी आपल्या पथका समवेत घटनास्थळी दाखल होत वाळू उपसा करणाऱ्या होड्यांचे पंचनामे करत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसाठी पुढील कार्यवाही सुरू केली. या कारवाई वेळी नायब तहसीलदार मुसळे, पास्ते, तलाठी आरोंदा, नागराज, तलाठी आजगाव, कोदे मंडळ अधि.आजगाव, गोरे तलाठी मळेवाड, जितेंद्र जाधव, पो. पा. आरोंदा, भगीरथ मौळे पो. ना. सा. पो. स्टे, मच्छीमार ग्रामस्थ नामदेव तारी, सिताराम तारी, अमित कोलंबकर, चोदणकर, हे. को. बाबुराव जाधव आदीं उपस्थित होते.