रूग्णांच्या जिवाशी खेळतोय कोण…? | रामभरोसे कारभार करतोय कोण..?
‘महाराष्ट्र माझा’ चे प्रतिनिधी मयूर ठाकूर यांनी या प्रश्नाकडे वेधलेलं लक्ष
कणकवली | मयुर ठाकूर : जनसामान्य गोरगरीब रुग्णांचं आधारवड असलेलं कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे मागील काही दिवसांपासून अनेक प्रश्नांच्या विळख्यात सापडलेले आहे. कधी डॉक्टर उपलब्ध नाहीत..? तर एक एकदा डॉक्टर केवळ हजेरी लावतात. त्यात रुग्णालयातील स्वछतागृहांची दैनावस्थाच..! याला जबाबदार कोण ? उपजिल्हा रुग्णालयाच्या दैनावस्थेला वाली कोण ? की आभारांचे गुच्छा घेऊन साहेब खुश झाले.?
उपजिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात जर एखादा सर्वसामान्य रुग्ण गेला तर तो जातानाच्या परिस्थितीत पुन्हा माघारी येईल याचे शाश्वती नाही मोठ्या प्रमाणात दुर्गंधी देखील तितकीच पसरलेली त्यात स्वच्छता राखा स्वच्छता राखा करणारे बोर्ड एक केवळ बोर्डस राहिले मात्र उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छतागृहातून बाहेर आल्यावर सुरक्षा म्हणून लागणारे वॉश बेसिन देखील कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नाही ही एक प्रकारची खंतच….


स्वच्छता गृहांमध्ये अस्वच्छता तर काही स्वच्छतागृहांमध्ये आवश्यक साधनेच नाही, मग येणारे सामान्य रुग्ण हे करणार तरी काय ..? जिल्हा शल्य चिकित्सक येतात आणि कर्मचारी वर्ग व त्यांच्याकडून झालेल्या चुकीची माफी मागतात आणि मोकळे होतात पण सामान्य माणसाचं काय ? जिल्हा शल्य चिकित्सक ही गैरसोय दूर करणार की या समस्येकडे दुर्लक्ष करणार ? असाही प्रश्न रुग्णांचे नातेवाईक उपस्थित करत आहेत.
गुणवत्ता म्हणजे लहान गोष्टीही तितक्याच कुशलतेने करणे – साहेब मग हे काय ?
जिल्हा रुग्णालयाआधी उपचार घेण्याचे ठिकाण म्हणजे उपजिल्हा रुग्णालय.! मात्र हेच उपजिल्हा रुग्णालय आता छोटमोठ्या गोष्टींनी कमी पडू लागले. डॉक्टरांची असलेली कमतरता दूर झाली मात्र रुग्णसेवेच आणि स्वच्छतेच काय ? जिल्हा शल्यचिकित्सकांना या सर्व प्रकरांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाहीच काय ? असा प्रश्न सर्वसामान्य रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित करत आहेत.
X – Ray रिपोर्ट बाबतही हलगर्जीपणा कायमच

एखाद्या छोट्या -मोठ्या अपघातानंतर उपचारासाठी एखाद्या रुग्णाला जर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तर X – ray विभागात रुग्णांना X – ray रिपोर्ट मोबाईल वर फोटो काढून मिळतात. आरोग्य यंत्रणा एवढी खिळखिळी बनली आहे की काय ? असाही प्रश्न रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित करत आहेत. महिला वॉर्ड आणि ICU विभाग सुरू करणे या गोष्टींकडे थोडासा लक्ष देऊन सदरचे काम पूर्ण करून सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या प्रकारचे उपचार कणकवली उपजिल्हा रुग्णयालतच मिळतील अशी व्यवस्था करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक आणि सर्वसामान्य जनतेचे साहेब आता या प्रकराकडे लक्ष देऊन ठराविक मुदतीच्या काळात काम करून घेतील का असाच सवाल आता उपस्थित होत आहे.





