धक्कादायक | लग्न होत नसल्याने युवकाने स्वतःचे आयुष्यच संपवले

272

आचरा : येथील चंद्रशेखर भालचंद्र मुळये (वय ३६ ) यांनी स्वतःचे लग्न होत नसल्याने ठासणीच्या बंदुकीने डोक्यावर गोळी मारून स्वतःचे आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना मालवण तालुक्यातील मठ बुद्रूक लिंग्रसवाडी येथे मंगळवारी घडली.

सविस्तर वृत्त असे की, मयत चंद्रशेखर भालचंद्र मुळये (वय – ३६ ) यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस घडली. या बाबतची खबर त्याचे वडील भालचंद्र रघुनाथ मुळये यांनी आचरा पोलीस स्टेशनला दिली आहे. अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बंगडे, पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई करत आहेत.