Kankavli | धक्कादायक बातमी.! जि. प. च्या जड वस्तू संग्रह भांडारातील साहित्याची चोरी | चोरीचा प्रकार पुन्हा सुरू…

94

कणकवली : एकात्मता बाल विकास योजना इमारतीच्या आवारा मधील जड वस्तू संग्रह भांडराचे कुलुप तोडुन अज्ञात चोरट्याने १३ हजार ५७६ रुपये किमतीच्या जीर्ण आणि निरोपयोगी वस्तू चोरून नेल्या. ही घटना १० एप्रिल रोजी उघडकीस आली. याबाबतची फिर्याद जि. प. बांधकाम उपविभाग कणकवलीचे कनिष्ठ सहाय्यक तानोज नारायण कळसुलकर यांनी दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० एप्रिल रोजी एकात्मता बाल विकास योजना विभागातील कर्मचारी सकाळी ९:३० वा. आले त्यावेळी त्यांना भांडाराचे कुलूप तुटलेले दिसले . त्यामुळे त्यांनी याबाबत जि. प. बांधकाम उपविभाग कणकवलीचे कनिष्ठ सहाय्यक तानोज कळसुलकर याना माहिती दिली. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी येऊन पाहणी केली असता भांडरतील काही जीर्ण आणि निरोपयोगी वस्तू चोरीस गेल्याचे आढळले.