Malvan | बनावट खरेदी खत करून फसवणूक | संशयित आरोपीला १५ एप्रिल पर्यत पोलीस कोठडी

64

सहायक सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांनी काम पाहिले

मालवण : बनावट खरेदी खत करून फसवणूक केल्याप्रकरणी नोव्हेंबर २०१६ साली आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असलेला संशयित आरोपी विनोद विवेक लाड (वय ४२) रा. आडवली भटवाडी मालवण याला पोलिसांनी अटक करून मंगळवारी मालवण न्यालयालात हजर केले. त्याला न्यायालयाने शनिवार १५ एप्रिल पर्यत पोलीस कोठडी सुनवली आहे. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांनी काम पाहिले.

गाव मौजे श्रावण येथील ७२ गुंठे जमिनीचे बनावट खरेदी खत करून जमिनीचा व्यवहार पूर्ण करून विनोद लाड यांनी मालडी आडवली येथील फिर्यादीची फसवणूक केली. या गुन्हे प्रकरणात अन्य चार संशयित आरोपी असून त्यापैकी दोघांना यापूर्वी जामीन मंजूर आहे. तर अन्य दोन संशयित यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. याप्रकरणी आचरा पोलीस अधिक तपास करत आहेत.