कणकवली I मयुर ठाकूर : तालुक्यातील एअरटेल नेटवर्क मागील काही दिवसांपासून खंडित आहे. अशातच कणकवली शहरासह आजूबाजूच्या गावांना देखील या नेटवर्कच्या ढासळलेल्या सेवेमुळे नेटवर्क युजर्स वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे. कणकवली तालुक्यात ही समस्या वरचेवर भेडसावत आहे. मात्र सुशेगात असलेली एअरटेल नेटवर्क कंपनी याकडे अर्वाच्य भाषेत डोळेझाक करत आहे.
कणकवली तालुक्यात बांधकरवाडी येथे ट्रक टॉवर उभारण्यात आला आहे. तोही श्रेयवादातच राहीला..! परंतु नेहेमी 1 तास पेक्षा जास्त काळ एअरटेल नेटवर्क सेवा खंडित होते. शहरासारख्या भागात जर अशी परिस्थिती अस तर खेडेगावात नेटवर्क चा किती मोठा खोळंबा असेल हे आता लोकप्रतिनिधींनीही पाहणे गरजेचे आहे.





