शेतकऱ्यांसाठी तीन नव्या सहकारी संस्था…!

नवी दिल्ली : सेंद्रीय उत्पादने, बी-बियाणे व शेतमालाची निर्यात यांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन नव्या सहकारी संस्था स्थापन करण्याचा केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार समितीने यापूर्वीच याविषयी निर्णय घेतला होता. या निर्णयावर मंत्रीमंडळाने शिक्कामोर्तब केले.