अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री गण आज अयोध्येच्या श्रीरामाच्या दर्शनाला गेले आहेत या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलले की , प्रभू राम ही आपली ओळख आहे. विस्मयकारक राममंदिर पाहणे हे आमचे स्वप्न होते ते पूर्ण झाले . अयोध्येत ज्या पद्धतीने राममंदिराचे बांधकाम सुरू आहे, त्याचा विचार कोणीही करू शकत नाही. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचेही ते स्वप्न होते.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ही माझी पहिलीच अयोध्येला भेट आहे आणि मला खरोखरच धन्य वाटत आहे. हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे आणि आमच्या भेटीची सुरळीत व्यवस्था केल्याबद्दल मी उत्तर प्रदेश सरकारचे आभार मानतो.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की , आम्ही पवित्र यमुना नदीच्या आरतीला देखील उपस्थित राहणार आहोत तसेच येथील संत महंतांच्या देखील भेटी घेणार आहोत.

राममंदिर हा आमचा राजकीय अजेंडा कधीच नव्हता, पण आमची श्रद्धा आणि आस्था आम्हाला या मार्गाकडे नेत आहे. आमची अयोध्या भेट अनेकांना सकारात्मक संदेश देत आहे पण त्याच वेळी नेहमीप्रमाणे काही लोक अस्वस्थ आहेत. आपला हिंदू धर्म आपल्याला सहिष्णुता शिकवतो. तो कोणाचाही अपमान करत नाही. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाले. शिवसेना आणि भाजपची विचारसरणी समान आहे म्हणून महाराष्ट्रातील जनतेने भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट जनादेश देऊ केला पण काही लोकांच्या स्वार्थापोटी त्या जनादेशाचा विश्वासघात झाला. आम्ही महाराष्ट्रात। आता ती युती पुनर्स्थापित केली आहे, आम्हाला लोकांच्या डोळ्यात समाधान आणि आनंदाची भावना दिसत आहे . राममंदिराला विरोध करणारे आणि बाळासाहेब ठाकरे यांना कधीही पसंत नसलेल्यांबरोबर उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन केले होते हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे . अशी खंत देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

आयोध्या मध्ये पदार्पण झाल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सह सर्वांनी प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊन आरती मध्ये सहभाग घेतला . यानंतर नव्याने निर्माण होत असलेल्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली . तसेच याबद्दल संबंधितांकडून अधिक माहिती जाणून घेतली . मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या या आयोध्या दौऱ्यात त्यांच्याबरोबर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण , दीपक केसरकर यांच्यासह अनेक
मंत्रीगण तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले आहेत





