धक्कादायक ..! प्रेम संबंधाचा राग अन् झाली मारहाण ; एकाचा मृत्यू

655

मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; अधिक तपास सुरू

कणकवली I मयुर ठाकूर : प्रेम संबंधाच्या रागातून केलेल्या मारहाणीत बोर्डवे सुंदर वाडी येथील दीपक वामन येंडे ( वय – ५६, सध्या रा. कट्टा एस टी स्टॅण्डच्या पाठीमागे ता. मालवण) यांचा मृत्यू झाला. दीपक यांचा भाऊ संतोष वामन येंडे (५२, रा. बोर्डवे सुंदरवाडी) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संतोष शेंडे यांच्या तक्रारीवरून गणेश गावडे (वय सुमारे ३५), अनाजी गावडे (वय –  सुमारे ४०) आणि एक अनोळखी इसम अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री ११ वा. च्या सुमारास मौजे चौके भराडी मंदीर नजीक माळरानावर घडला.

संतोष येंडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी माझी पत्नी सुजाता, आई जयवंती, मुलगा विराज, मुलगी तन्वी, तसेच माझा मोठा भाऊ सखाराम, त्याची पत्नी व मुलगा अशी बोर्डवे येथे एकत्र कुटुंबात राहतो. माझा दोन नंबरचा भाऊ दीपक वामन येंडे हा कट्टा एसटी स्टँडचे पाठीमागे सध्या एकटाच भाड्याने राहण्यास आहे त्याचे चौके बाजार येथे बांगडी विकण्याचे दुकान आहे. त्याची पत्नी दोन वर्षांपूर्वी मयात झालेली आहे त्यांची मोठी मुलगी प्रियांका दीपक येंडे ही तिचे पतीसह नालासोपारा येथे राहण्याचा आहे. तसेच लहान मुलगी प्राजक्ता ही तिच्याकडे राहते. ८ एप्रिल रोजी मी माझे कुटुंबासमवेत घरी जाताना रात्री १०.४७ वाजता माझ्या पुतणी प्रियांक हीचा माझ्या मोबाईलवर फोन आला. तिने पप्पांना कोणीतरी चौके येथे मारत आहे तुम्ही ताबडतोब तेथे जा असे सांगितले. त्यावर मी तिला कोण मारत आहे असे विचारले असता गणेश गावडे नामक कोणीतरी इसम आहे असे त्याने पप्पांच्या मोबाईलवरून फोन करून सांगितले आहे. त्यानंतर मी माझा भाऊ दीपक याच्या मोबाईल वर कॉल केला असता इसमाने फोन उचलला. मी त्याला काय झाले असे विचारले असता त्याने तुमचा भाऊ जिवंत हवा असेल तर ताबडतोब येऊन जावा असे सांगितले. फोन चालू असताना सोडू नको असे बोलायचे आवाज येत होता. त्यावर मी त्याला कुठे यायचे आहे असे विचारले असता त्याने कुपेरीची घाटी चढल्यावर फोन करा कुठे यायचे ते मी तुम्हाला सांगतो. मी त्यांनी विनंती केली तुम्ही भाऊ दीपक याला मारू नका मी लगेच निघतो आहे असे सांगितले. भाऊ सखाराम त्यांचा मुलगा रोहित पत्नी सुजाता व मुलगा विराज शेजारी राहणारा चुलत भाऊ विठ्ठल बाळकृष्ण येंडे यांना लगेचच सांगितले त्यानंतर मुलगा विराजाने त्याचा मित्र मनीष याला फोन करून त्याची ईको गाडी आमच्या घराजवळ बोलवून घेतली. मनीष गाडी घेऊन आल्यानंतर त्याचे एक गाडीने रात्री अकरा वाजताच्या सुमारास मी, चुलत भाव विठ्ठल येंडे, पुतण्या रोहित चौके येथे जाण्यास निघालो. आम्ही कसाल मार्गे कुपेरीची घाटी चिडून आल्यानंतर भाऊ दीपक याच्या मोबाईलवर फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु फोन लागला नाही म्हणून आम्ही चौके बाजारात गेलो. त्यानंतर परत फोन लावला त्यावेळी त्याच इसमाने फोन उचलला व आम्हाला परत यायला सांगून भराडी मंदिर जवळ आला की गाडी स्लो करा मी रोडवर थांबतो असे सांगितले. त्याचप्रमाणे आम्ही भराडी मंदिरच्या दिशेने जाण्यास निघालो. भराडी मंदिराचे पुढे समोर १०० मीटर अंतरावर एक इसम रस्त्यावर थांबलेला दिसला त्यांनी आम्हाला हाताने गाडी रस्त्याच्या डाव्या साईडला लावायला सांगितले. आम्ही सर्वजण गाडीतून उतरलो आणि पाहिले असता माझा भाऊ दीपक हा मान जमिनीला टेकून बसलेला होता तसेच त्याचे दोन्ही पाय रक्तबंबाळ झालेले होते. रस्त्यावर आलेल्या इसमासोबत अन्य दोन अनोळखी इसम त्या ठिकाणी होते. त्यावेळी ते तीनही इसम दीपक याला शिवगाव करत होते. मी त्यांना काय झालं कोण तुम्ही त्यावर त्यांच्या पैकी एकाने तुझा भाऊ माझ्या बहिणीची छेड काढता त्यामुळे त्याला प्रसाद दिला आहे. तो परत इकडे दिसला तर त्याला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत दीपक याच्या केसाला धरून हाताच्या थापटाने दोन वेळा थोबाडीत मारले. तसेच सोबतच्या इसमाने दीपकच्या कमरेवर लाथा मारू लागले. त्यावर पुतण्या रोहित याने त्यांना मारण्यापासून अडविले त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण गणेश गावडे याला सोडू नको असे म्हणत होता. मी त्या दोन्ही इसमांना नाव विचारलं असता एकाने त्याचे नाव अनाजी गावडे असे सांगितले परंतु तिसरं नाव सांगायला तयार नव्हता. आम्ही सर्व जण त्यांना दिपक याला मारू नका अशा विणवण्या करून त्या तिघांच्या तावडीतून सोडवून दिपक याला आमच्या गाडीत घातले. आम्ही दिपक याला उठविण्याचा प्रयत्न करत होतो परंतु तो काही प्रतिसाद देत नव्हता. आम्ही त्याला उपचाराकरीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी माऊ दिपक याला तपासून तो मयत झाल्याबाबत सांगितले. असे तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत मालवण पोलीस ठाण्यात रविवारी भा. द. वि. कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली. तर तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.