सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र पवार…! | उपाध्यक्षपदी ‘महाराष्ट्र माझा’चे उपसंपादक हेमंत मराठे बिनविरोध

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या तालुका कार्यकारिणी समितीच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया जिखमाना मैदानावरील सभागृहात जिल्हा पत्रकार संघाच्या सचिव तथा निरिक्षक देवयानी वरसकर व जिल्हा सदस्य दिपेश परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यात उपाध्यक्षपदी हेमंत मराठे, दीपक गांवकर, काका भिसे, प्रसन्न राणे, सचिव मयुर चराठकर, खनिजदारपदी रामचंद्र कुडाळकर तर सहसचिवपदी विनायक गांवस यांची निवड करण्यात आली.

बिनविरोध पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत अध्यक्ष व प्रमुख पदांसह कार्यकारीणी सदस्य म्हणून मोहन जाधव, नरेद्र देशपांडे, राजू तावडे, लुमा जाधव, जुईली पांगम, निलेश परब, विजय राउत, मंगल कामत, उत्तम नाईक, हर्षवर्धन धारणकर, जतिन भिसे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी माळवते तालुकाध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांच्यासह मागील कार्यकारिणीनं केलेल्या गौरवास्पद कार्यासाठी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

दरम्यान, हेमंत मराठे व निलेश परब दोन्हीहि अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. मात्र दोघांनीही समझोता करत हरिश्चंद्र पवार यांना अध्यक्षपदाची संधी दिली. एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणात हि निवड प्रक्रिया पार पडली.