देवगड : केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या १० रप्रिल २०२३ रोजी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसा प्रीत्यर्थ देवगड जामसंडे भा.ज. पा. शहर च्या वतीने माणूसकी चे देवदर्शन हा एक स्तुत्य आणि अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून समाजापासून उपेक्षित आणि वंचित असणाऱ्या शिरगाव असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील चार भिंतींच्या आत आपल्या आयुष्यातील जीवन जगत असणाऱ्या निराधार आजी आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हास्य फुलविण्यासाठी व त्यांना देवदर्शनाबरोबरच पर्यटन स्थळांच्या विरंगूळ्याचे चार क्षण अनुभवता यावेत या उदात्त हेतूने देवगड शहरातील धार्मिक मंदिरातील देवदेवतांचे दर्शन व पर्यटन स्थळाच्या विशेष भेटीचे आयोजन रविवार दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ठीक ९ वाजलेपासून सायंकाळी ठीक ६ वाजेपर्यंत करण्यात आले आहे, श्री, दिर्बा रामेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन व श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. त्यानंतर waxम्युझियम देवगड येथे भेट दिल्यानंतर देवगड भाजपा.शहर च्या वतींने वृद्धाश्रमातील जेष्ठ वृद्ध आजी आजोबांचा सत्कार व सन्मान करण्यात येणार असून त्यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात येईल व सर्वांना अल्पोपहार देण्यात येईल. त्यानंतर ब्राम्हण देव मंदिर दर्शन घेतल्या नंतर कोकण ची काशी समजल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध श्री, देव कुणकेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन देवगड किल्ला, लाईट हाऊस गणपती मंदिर दर्शन घेऊन वृद्धाश्रमातील आजी आजोबां समवेत उपस्थितीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्रित स्नेहभोजनाचा आनंद लुटता येईल, दुपारच्या स्नेहभोजनानंतरच्या विश्रांती नंतर सायंकाळच्या सत्रामध्ये देवगड, बंदर देवगड बीच, पवन चक्की प्रकल्प, आणि अल्पावधीतच जागतीक दर्जाच्या पर्यटनाच्या नकाशावर आलेले देवगड पवनचक्की गार्डन आणि झिपलाईन इत्यादी पर्यटन स्थळांचा आस्वाद घेऊन ही धार्मिक व पर्यटन सहल पुन्हा दिविजा वृद्धाश्रमाकडे मागस्थ होऊन या अभिनव व स्तुत्य उपक्रमाची सांगता होईल
*तरी वरील कार्यक्रमात सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आजी माजी नगरसेवक शक्ती केंद्र प्रमुख, बुथअध्यक्ष, कार्यकर्ते व जेष्ठ नागरीकांनी संपूर्ण दिवसभर उपस्थित राहून वृद्धाश्रमातील आजी आजोबांचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन देवगड भाजपा शहरच्या वतीने करण्यात आले आहे





