देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्षपदी अयोध्या प्रसाद गावकर यांची फेरनिवड…

128

देवगड : देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्षपदी अयोध्या प्रसाद गावकर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. देवगड तालुका पत्रकार समितीच्या नूतन कार्यकारणीची निवडप्रक्रिया शनिवार दि ८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता देवगड सातपायरी येथील हॉटेल डायमंड येथे निवडणूक निरीक्षक महेश रावराणे व महेश सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या निवड प्रक्रियेत देवगड पत्रकार समितीच्या जुन्या कार्यकारणीची सर्वानुमते पुन्हा एकदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. यामध्ये अयोध्याप्रसाद गावकर (अध्यक्ष),अनिल राणे (उपाध्यक्ष), दयानंद मांगले (उपाध्यक्ष),सचिन लळीत (सचिव),महेश तेली (सहसचिव),श्रीकृष्ण रानडे (खजिनदार),तर कार्यकारणी सदस्यपदी राजेंद्र साटम,गणेश आचरेकर,संतोष कुलकर्णी,सुरज कोयडें,प्रशांत वाडेकर आदींची कार्यकारणीवर बिनविरोध निवड झाली आहे. देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने सर्व नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले.या निवडणुकीला जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्र मुंबरकर, राजीव पडवळ, दिनेश साटम, साईनाथ गावकर, विश्वास मुणगेकर शंकर मुणगेकर संतोष साळसकर, प्रदीप घाडी, स्वप्निल लोके, दिनेश साटम, वैभव केळकर आदी तसेच देवगड तालुका समितीचे सदस्य सर्व सदस्य या सभेस उपस्थित होते.