मालवण : ग्रामपंचायत घुमडे वरची बिरमोळेवाडी येथे जलजीवन मिशन योजनेतून नव्याने सुरू करण्यात आलेल्या नळपाणी योजनेचा शुभारंभ घुमडे गावचे ज्येष्ठ नागरिक सुरेश(दादा) बिरमोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच सुभाष(दिलीप) बिरमोळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी सरपंच सौ. स्नेहल बिरमोळे, उपसरपंच राजू सावंत, ग्रामसेवक सौ. युती चव्हाण, माजी सरपंच व ग्रा.प. सदस्य चंदा वस्त, ग्रामपंचायत सदस्य शुभराव राणे, सौ. सुगंधा बिरमळे, योगेश सामंत, सौ. योगिता जाधव, सुनील टेंबुलकर, ठेकेदार आबा पालव, ग्रामस्थ विनोद बिरमोळे, संतोष बिरमोळे, लक्ष्मण(बाळा) बिरमोळे, सुनील बिरमोळे, प्रकाश बिरमोळे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते





