BSNL नेटवर्क सेवेचा प्रश्न काही सुटेना | कणकवली तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क खोळंबला

58

कळसुलतील BSNL टॉवर वारंवार पडतायत बंद | ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

कणकवली : तालुक्यातील कळसुली गावातील BSNL टॉवर वारंवार बंद पडत आहे. BSNL कणकवली कार्यालयात कळसुली ग्राम. सदस्य कल्पेश सुद्रिक यांनी उपमंडल अधिकारी योगेश भागवत यांची भेट घेवून, कळसुली गावातील दोन्हीं BSNL टॉवर वारंवार बंद पडत असून टॉवर सुस्थितीत करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. या मागणीला कणकवली BSNL टॉवर अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केला आहे.

राज्यात 5G सुविधा मिळत असुन कळसुली गावात अजुन 2G सुद्धा मिळत नसल्याने स्थानिक ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जातं आहे. गावाची लोकसंख्या जवळपास ३५०० च्या आसपास असून या गावात BSNL चे २ टॉवर असून दोन्ही टॉवर वारंवार बंद पडत आहेत. या नेटवर्कचा फटका माञ गावातील शासकीय यंत्रणेला बसत आहे. नेटवर्क अचानक जात येत असल्याने नेटकरी माञ कोमात अशी काहीशी स्थिती BSNL च्या वारंवार बिघाडामुळे झाली आहे. हा कळसुलीतील BSNL नेटवर्क सेवा व्हेंटिलेटवर असल्याचे पहायला मिळत आहे.

कळसुली BSNL नेटवर्क टॉवरची केबल वागदे, हळवल, शिरवल, कळसुली डोंगरातील झाडांचा आधार घेत कळसुली गावात आलेली आहे. ही केबल ओपण जंगलातून आली असल्याने आग लागली की जळून जाते, असं वारंवार कारण BSNL कणकवली कार्यालयातून वेळ मारून नेला जातो. वारंवार आग लागते हे कारण अधिकाऱ्यांना योग्य नसल्याने ठोस उपायोजना करा अन्यथा आंदोलनच्या छेडण्याच्या पवित्रा कळसुली ग्रामस्थानी केला आहे.

कळसुली ३५०० लोकसंख्या असलेल्या गावात BSNL कंपनी व्यतिरिक्त कोणतेही नेटवर्क येत नसल्याने बीएसएनएल सिमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. ग्राहकांची संख्या लक्षात घेता BSNL कंपनीने असलेल्या समस्या तातडीने मिटविणे अत्यंत गरजेचे आहे. कळसुली गावासाठी कोण टॉवर देता ? अशी मागणी नेटकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.