मालवण : भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी यासह वीर सावरकर घोषणांनी व ढोल ताशा गजरात, भगवे झेंडे, टोप्या या भगव्या वातावरणात मालवण नगरी मंगळवारी रंगून व दणाणून गेली. मालवण शहर मार्ग गर्दीने भरून गेला. भव्यदिव्य स्वरूपात ही रॅली लक्षवेधी ठरली.

दरम्यान, भारतमातेसाठी अनेक हालअपेष्टा सहन करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार घराघरापर्यंत पोहचवायचा आहे. हिंदू धर्म रक्षण करणे हे वीर सावरकर यांना अपेक्षित होते. ते आपण सर्वांनी करूया. असे सांगत भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी प्रचंड मोठ्या संख्येने एकवटकेल्या जनसमुदायला संबोधित केले.
निलेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व ठाकरे गट यांच्यावरही जोरदार शाब्दिक प्रहार केला. राहुल गांधी ढोंगी आहेत. गांधी नव्हे तर त्यांचे आडनाव बाटलीवाला आहे. ते ऐकायला बरे वाटत नव्हते म्हणून गांधी. त्यामुळे जे गांधी नाहीत ते सावरकर होऊच शकत नाहीत. गांधी घराण्याने देशाची वाट लावली. असाही प्रहार निलेश राणे यांनी केला. त्याबरोबर आता काँग्रेसच्या मांडीला मांडी लावणारे उद्धव ठाकरे मुघलांचे कार्य सांगतात. आज बाळासाहेब असतात तर चित्र वेगळे असते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जनतेला अपेक्षित कार्य करत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे. राष्ट्राला, तमाम जनतेला अपेक्षित कार्य करत आहे. असेही निलेश राणे म्हणाले.
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ भाजप व शिवसेना यांच्या वतीने वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन मंगळवारी मालवण भरड नाका ते बंदर जेटी या मार्गावर करण्यात आले. भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य अश्या स्वरूपात विर सावरकर गौरव यात्रा निघाली. ढोल ताशा गजर, वीर सावरकर वेशभूषा साकारलेने व्यक्तिमत्त्व व चित्ररथ लक्षवेधी ठरला. जोरदार घोषणांनी मालवण नगरी दणाणून गेली. बंदर जेटी येथे निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ पूजन झाल्यानंतर राजन तेली यांनी सागराला श्रीफळ अर्पण केले. विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन चारित्र्यवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान मामा वररेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले होते. त्या व्याख्यानाला निलेश राणे यांनी उपस्थिती दर्शवली. मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी यावेळी उपस्थित होते.

यावेळी सावरकर प्रेमी व कुडाळ मालवण तालुक्यातील भाजप शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, राजू राऊळ, प्रभाकर सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, आनंद शिरवलकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, दादा साईल, विलास कुडाळकर, नारकर, दीपक पाटकर, ऍड. गव्हाणकर, सुनील घाडीगांवकर, महेंद्र चव्हाण, अनिल निव्हेकर, जेरॉन फर्नांडिस, अनिल कांदळकर, संतोष साटविलकर, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, महेश मांजरेकर, गणेश कुशे, बाबा मोंडकर, राजन गावकर, आबा हडकर, महेश बागवे, अमित गावडे, महेश गावकर, केपी चव्हाण, दादा नाईक, सुमित सावंत, राजू बिडये, दीपक सुर्वे, संतोष गांवकर, पूजा करलकर, स्नेहा आचरेकर, चारुशीला आचरेकर, पूजा सरकारे, पूजा वेरलकर, शर्वरी पाटकर, ममता वराडकर, प्राजक्ता बांदेकर, यासह अन्य महिला पदाधिकारी, युवमोर्चा पदाधिकारी विक्रांत नाईक, मंदार लुडबे, सुशांत घाडीगांवकर, ललित चव्हाण, राकेश सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, कुडाळ मालवण क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाध्यक्ष राजा गांवकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकप्रमुख पराग खोत, महिला पदाधिकारी यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदुत्ववादी संघटना या रॅलीत सहभागी झाल्या.
विजय केनवडेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी विचार मांडले. कौस्तुभ गव्हाणकर या छोट्या मुलाने वीर सावरकर यांच्यावर कथा सांगितली. याला उपस्थितांनी विशेष दाद दिली.





