युवतीच्या विनयभंगप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल..!

65

कणकवली : २२ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच युवतीच्या आईसह शेजाऱ्यांना शिविगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गजानन चंद्रकांत शिरखंडेकर (३८) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवा सायंकाळी ६.३० वा. सुमारास घडल्याचे युवतीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. युवती घरी जात असताना संशयिताने तिचा घरापर्यंत पाठलाग केला. त्यानंतर थेट घरात घुसून युवतीच्या मनात लज उत्पन्न होईल, असे वर्तन केले. युवतीने आरडाओरड केली असता युवतीची आई व शेजाऱ्यांनी तेथे धाव घेतली, त्यावेळी संशयिताने त्यांना शिविगाळ करत धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.