बांदा : विलवडेत गव्यांनी शेती बागायत नुकसानींचे सत्र सुरुच आहे. आणि आता मगरींचे सकंट आले आहे. विलवडे धरण येथे पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन बकर्याचा मगरीने पाण्यात ओढून नेत शेतकर्याच्या डोळ्यादेखत फडशा पाडल्या. मालकानी वेळीच प्रसंगावधान दाखवित इतर बकर्यांना पाण्यात बाहेर काढले. भालावल येथील शेतकरी भालचंद्र रामू कोकरे यांचे २५ हजारांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. वनविभागाने या घटनेची पहाणी नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी मागणी माजी विलवडे मनसे शाखा प्रमुख श्रीराम सावंत यांनी केले आहे.
विलवडे गावात गव्यांनी शेती बागायतीचे होैदोस मांडला आहे. आतापर्यंत विलवडे धरण परिसरात मगरीने पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सायंकाळी नेहमीप्रमाणे कोकरे हे बकर्यांच्या कळपाला विलवडे धरणात पाणी पिण्यासाठी घेऊन गेले होते. अचानकपणे दबा धरुन बसलेल्या मगरीने बकर्यावर हल्ला करत पाण्यात ओढून नेत दोन बकर््यांचा फडशा फाडल्याचे कोकरे यांनी सांगितले. धरण परिसरात दहा हून अधिक (पाच ते दहा फूट लाबींच्या) मगरी आहेत. कोकरे प्रसंगावधान दाखवत मगरी वर दगडांचा वर्षाव केला व आरडाओरड करताच इतर बकर्यांना पाण्यातून बाहेर काढल्याचे कोकरे यांनी सांगितले.
याबाबत संतोष सावंत यांनी निद्रिस्त वनविभाग विरोधात संताप व्यक्त केला आहे. विलवडे व वाफोली धरण परिसरात ठिकठिकाणी मगरींचे वास्तव्य आहे.त्याच बरोबर गव्यारेड्याचा बंदोबस्त करण्याबाबत वनविभाग चालढकल करीत असल्याचा आरोप संतोष सावंत यांनी केला आहे.





