कणकवली : तालुक्यातील कनेडी बाजारपेठ ते सांगवे – संभाजीनगर असे पायी चालत येत असताना शिवाजीनगर येथे कनेडी ते कणकवलीच्या दिशेने जाणारा मोटर सायकलस्वार मंगेश अंकुश मेस्त्री ( रा. दिगवळे ) याने पादचारी उदय तुकाराम सावंत ( ६६, रा. सांगवे – संभाजीनगर ) यांना पाठीमागून ठोकून अपघात केला. त्यात ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला, हनुवटीला व दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. तर मोटर सायकलस्वार मंगेश मेस्त्री व पाठीमागे बसलेला अमित सूतार ( रा. सांगवे ) हे किरकोळ जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सायं. ७:३० वा. च्या सुमारास घडला. जखमी उदय सावंत यांच्यावर कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची फिर्याद प्रविण सावंत यांनी दिली. अधिक तपास कनेडी दूरक्षेत्राचे पोलिस करत आहेत.





