देवगड : मार्च महिना अखेरीस गावागावामध्ये प्राणी प्रश्न भीषण बनत चालला आहे. अशातच पाणी प्रश्नावरून चक्क ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्या व ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद धक्काबुक्की किरकोळ मारहाणी होऊन राग आल्याने सभेतुन बाहेर पडलेल्या ग्रामस्थ पती पत्नी यांनी सभागृहाच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावून सरपंच, ग्रामसेवक यांचेसहित ग्रामस्थ सदस्य यांना कोंडून ठेवल्याची घटना 31 मार्च रोजी झालेल्या गिर्ये ग्रामसभेत घडली. या प्रकरणी पती-पत्नी गीता संतोष पुजारे व संतोष लक्ष्मण पुजारे यांच्या विरोधात विजयदुर्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाले आहेत.ही घटना 31 मार्च रोजी सकाळी घडली .याबाबत सविस्तर तक्रार ग्रामसेवक यांनी विजयदुर्ग पोलिसात दिली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिर्ये ग्रामपंचायतीची ग्रामसभा 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत सभागृह सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामसेवक उपस्थित सुरू होती. दरम्यान सभेला उपस्थित ग्रामस्थ सौ नीता संतोष पुजारे व संतोष लक्ष्मण पुजारे यांनी सभेत पाण्याचा प्रश्न मांडला असता ग्रामपंचायत सदस्या प्रांजली कोलुंगडे व त्यांच्या मध्ये बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली.
यामध्ये महिला सदस्या व महिला ग्रामस्थ यांच्यामध्ये किरकोळ मारामारी झाली. ग्रामसभेत अशा प्रकारे गोंधळ झाल्यानंतर याचा राग आल्याने पुजारे पती पत्नी दोघेही सभागृह बाहेर पडली. व त्यांनी सभा सुरू असलेल्या हॉलच्या दरवाजालाच बाहेरून कडी लावली व सभेला उपस्थित असलेल्या सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक तसेच सदस्य यांना आत कोंडून ठेवले .याबाबत गिर्ये ग्रामसेवक आदित्य संतोष कदम यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गीता संतोष पुजारे व संतोष लक्ष्मण पुजारे या पती पत्नी विरोधात भादवि कलम ३५३,३४२,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव करत आहेत





