रूग्णांच्या जिवाशी खेळतोय कोण…? | रामभरोसे कारभार करतोय कोण..?

कणकवली | मयुर ठाकूर : गोरगरीब रुग्णांचं आधारवड असलेलं कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे मागील काही दिवसांपासून अनेक प्रश्नांच्या विळख्यात सापडलेले आहे. कधी डॉक्टर उपलब्ध नाहीत..? तर एक एकदा डॉक्टर केवळ हजेरी लावतात. मात्र, प्रत्यक्षात पाहायला गेलं तर डॉक्टर उपलब्धच नसतात. त्यात रुग्णालयातील स्वछतागृहांची दैनावस्था..! स्वच्छता गृहांमध्ये अस्वच्छता तर काही स्वच्छता गृहांमध्ये आवश्यक साधनेच नाहीत. मग येणारे सामान्य रुग्ण हे काय करणार ? जिल्हा शल्य चिकित्सक येतात आणि कर्मचारी वर्ग आणि झालेल्या चुकीची क्षमा मागून निघून जातात. ते पुन्हा कधी त्या दिशेला नवीन प्रश्न आणि त्याबाबतचे जाब विचारण्याची वेळ आली की येऊन बसणार. अशा छोटमोठ्या गोष्टींकडे जिल्हा शल्यचिकित्सकांना लक्ष देण्यासाठी वेळ नाहीच काय ? असा प्रश्न सर्वसामान्य रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित करत आहेत.

आ. नितेश राणे यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण सेवेसाठी डॉक्टर उपलब्ध करणार असल्याचा शब्द दिला होता. त्या प्रमाणे शब्दाची पूर्तता झाली. मात्र आताच्या घडीला उपजिल्हा रुग्णालयाची पाहाणी केली तर या रुग्णालयात उपचार घ्यायचे की उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात जायचे हा प्रश्नच त्या रुग्णांच्या नातेवाईकांमधून उपस्थित होतो. तसेच आ. नितेश राणे यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहाणी केली होती. मात्र त्यावरही आ. राणे यांनी नाराजी व्यक्त केली होती. काही दिवसांत ती परिस्थिती सुधारली परंतु स्वच्छता आणि उपचार संदर्भात सुधारित गोष्टी तशाच राहिल्या..! त्याच प्रमाणे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या नावांचे फलक लावा अशीही मागणी आ. नितेश राणे यांनी काही दिवसापूर्वी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचकित्सक यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे एक फलक लावून लावण्यात आली.x ray विभागात रुग्णांना x -ray मिळतात मोबाईल वर फोटो काढून. आरोग्य यंत्रणा एवढी खिळखिळी झाली की काय ? असाही प्रश्न रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित करत आहेत.

आ. नितेश राणेंच्या या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मात्र स्वच्छतेकडे, महिला वॉर्ड आणि ICU विभाग सुरू करणे या गोष्टींकडे थोडासा लक्ष देऊन सदरचे काम पूर्ण करून सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या प्रकारचे उपचार कणकवली उपजिल्हा रुग्णयालतच मिळतील अशी व्यवस्था करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांमधुन जोर धरू लागली आहे.