देवगड : आज सकाळी परिंचे येथील भाविक महादेवाची मानाची कावड घेऊन कुणकेश्वर येथे दाखल झाले. येथील समुद्रावरील तीर्थ कावडीत घेऊन वाजत गाजत कावड नाचवत मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली त्यानंतर कुणकेश्वर शिवलिंगावर कावडीतील समुद्रतिर्थाचा जलाभिषेक करून आरतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या वतीने कावड यात्रेचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. उद्या परींचे गावात कावडयात्रेची वाजत गाजत मिरवणूक काढून कावडीतील समुद्रतिर्थाचा महादेवावर जलाभिषेक करून या कावडयात्रेची सांगता होणार आहे.





