कणकवली शेतकरी संघाचा मिरची महोत्सव सुर..! | पहाच कुठे ते…

149

कणकवली : शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्या. कणकवली या संघाकडून दरवर्षी शेतकऱ्यांसाठी मिरची महोत्सवाचे आयोजन केले जाते. जनता व शेतकऱ्यांना माफक दरात मिरची उपलब्ध व्हावी यासाठी मिरची महोत्सव आयोजित करण्यात आला. त्याचा शुभारंभ तहसिलदार रमेश पवार कणकवली यांच्या हस्ते करण्यात आले.

शेतकरी संघाच्या कणकवली येथील समता बाझारजवळ हा मिरची महोत्सव सुरू करण्यात आला आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, संचालिका विनिता बुचडे, स्मिता पावसकर, तसेच संचालक गुरूप्रसाद वायंगणकर, रघुनाथ राणे, श्रीपाद पाताडे, संजय शिरसाट, अतुल दळवी, प्रशांत सावंत, व्यवस्थापक गणेश तावडे व शेतकरी कर्मचारी उपस्थित होते.