बांदा : रोणापाल-तळेवाडी येथील सौ. विजया दिलीप नाईक (वय 55) यांचे काल रात्री अचानक निधन झाले. मनमिळावू व सर्वांना आपलेसे करणाऱ्या विजया नाईक यांच्या निधनाने रोणापाल गाववर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती दिलीप नाईक, तसेच मुलगा, मुलगी, जावई, दिर, जाऊ, पुतणे, नात असा मोठा परिवार आहे. पाडलोस तंटामुक्ती समिती अध्यक्ष बंड्या माधव यांच्या त्या भगिनी होत.





