काळ आला पण वेळ आली नाही | धावती रेल्वे पकडताना महिला बचावली

57

अकोला : धावती रेल्वे पकडू नका असे अनेकदा रेल्वे प्रशासनाकडून वारंवार घोषित केले जाते . काही प्रवासी मात्र हा जीवावर बेतणारा हा प्रयोग करतातच. असाच एक प्रयोग करताना अकोला येथे महिला बचावली थोडक्यात बचावली आहे . अकोला रेल्वे स्थानकावर चालती रेल्वे पकडणं एका महिलेच्या चांगलंच जीवावर बेतल असत, मात्र तिचे नशीब बलवत्तर म्हणून काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर काल रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास एक महिला तिच्या मुलीसोबत मुंबईला जाण्यासाठी धावत्या अमरावती एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. मुलगी रेल्वेत चढ़ली खरी, पण पाठीमागे असलेल्या महिलेचा त्याच वेळी तोल गेल्याने ‘ती’ रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकून जात होती. प्लॅटफॉर्मवर असलेल्या ‘रेल्वे व्हेंडर’सह प्रवाशांनी तिला बाहेर ओढलं आणि रेल्वेखाली जाता-जाता महिला थोडक्यात बचावली.

इतकंच नव्हे तर आपल्या आईला पडताना पाहताच मुलीनेही चालत्या रेल्वेतून उडी घेतली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. असे प्रसंग पाहूनही काही रेल्वे प्रवासी मात्र त्यातून बोध घेताना दिसत नाहीत हे मोठे दुर्दैव आहे .