देवगडमध्ये 5 फेब्रुवारीला मिसळ महोत्सव…!

देवगड : आ. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगडात प्रथमच रोजगार पर्यटन व रोजगार ही दोन उद्दिष्ट ठेवून फेब्रुवारी 2023 रोजी मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मिसळ महोत्सव देवगड – जामसंडे शहरात देवगड कॉलेज रोड (सावंत कंपाऊंड) येथे आयोजित करण्यात आला असून, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे.

देवगडमध्ये हा पहीलाच मिसळ महोत्सव होत असून जिल्ह्यातील नामवंत मिसळचा आस्वाद देवगडमध्ये घेण्याची संधी मिळणार आहे. यानिमित्ताने नागरीकांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढण्यासही हातभार लागेल. देवगडात होणाऱ्या या मिसळ महोत्सवामुळे जिल्ह्यातील नागरीकांना एक नवीन उपक्रम अनुभवता येणार तसेच देवगडची नवीन ओळख या माध्यमातून देखील निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मिसळ महोत्सवाचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.