भूमिहीन लाभार्थींना घरकुलासाठी जागा देण्यात महाराष्ट्र अव्वल…!

मुंबई : राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मधील कायमस्वरूपी प्रतिक्षा यादी (PWL) मध्ये 94 हजार 251 व आवास प्लस (ड यादी) मध्ये 41 हजार 191 असे एकूण 1 लाख 35 हजार 442 भूमिहीन लाभार्थी असून आतापर्यंत 66 हजार भूमिहीन लाभार्थींना विविध योजनांतर्गत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच 69 हजार 442 भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. भूमिहीन लाभार्थींना जागा उपलब्ध करुन देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.