ॲड. दीपक पटवर्धन सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ : अतुल काळसेकर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ॲड. दीपक पटवर्धन हे हिरा असून महाराष्ट्रात ते सहकार क्षेत्रात दीपस्तंभ आहेत, असे उदगार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी काढले. ते पुढे म्हणाले की, पतसंस्था राज्य फेडरेशनच्या कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड होणे ही कोकणातील सहकार क्षेत्रातील अभिमानाची गोष्ट असून हा कोकणाचा सन्मान आहे, सहकार क्षेत्रातील कायदेशीर बाबींची सर्व माहिती असणारे, अभ्यासु नेतृत्व आहे.

पतसंस्थाच्या वसुलीसाठी राज्य फेडरेशनने विशेष पुढाकार घेऊन त्यासाठी योग्य धोरण आणणे गरजेचे आहे त्यासाठी ॲड. दीपक पटवर्धन यांनी जास्त लक्ष दयावे असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ॲड. दीपक पटवर्धन यांचा आज स्वामी स्वरूपानंद पतसंस्था आणि दक्षिण रत्नागिरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा कार्यक्रम आज रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे, द. रत्नागिरी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर,रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष थेराडे,जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार,राजापूर भाजपा तालुकाध्यक्ष अभिजित गुरव,लांजा भाजपा तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, संगमेश्वर भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव,रत्नागिरी भाजपा तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे,रत्नागिरी शहर भाजपा शहराध्यक्ष सचिन करमरकर, खारवी समाज पतसंस्था अध्यक्ष संतोष पावरी,देवरुखच्या नगराध्यक्षा सौ. मृणाली शेट्ये उपस्थितीत होते.