आ. कोळंबकर कुटुंबियांचे उपमुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन…!

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना कोळंबकर यांचे नुकतेच निधन झाले. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आ. कोळंबकर यांच्या भोईवाडा येथील निवासस्थानी जाऊन आ. कोळंबकर आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कोळंबकर कुटुंबियांचे स्नेही , नातलग उपस्थित होते.