देवगड : शनिवारी दुपारी फणसे , पडवणे , पालये या भागातील सुमारे पन्नास हून जास्त देवगड हापूसच्या बागा लागलेल्या आगीमध्ये जळून गेल्या .
या बागा जळल्याने आंबा बागायतदारांचे फार मोठे नुकसान झाले आहे . काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंबे लागले होते . कलमे जळल्याने आता पुन्हा कलमे उभी करणे अथवा कलमांना जगवणे ही गोष्ट बागायतदारांना करावी लागणार आहेत.
वाडा पालये परिसरातील घडलेल्या अग्नी तांडवाची आमदार नितेश राणे यांनी भेट देऊन पाहणी केली .शेतकऱ्यांकडून याची माहिती घेतली .शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले .आमदार नितेश राणे यांनी आपण याबाबत सरकारकडे भूमिका मांडून नक्कीच नुकसान भरपाई देऊ असा विश्वास दिला आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस बाळ खडपे तालुका अध्यक्ष अमोल तेली , बंड्या नारकर ,अरीफ बगदादी, बाळा गावकर, माजी सभापती रवी पाळेकर आदी उपस्थित होते .





