सावडाव येथे बिबट्याचा गाईवर हल्ला ; गाईचा मृत्यू…

50

कणकवली : सावडाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा मृत्यू झाला आहे. यात शेतकरी अनिल सावंत यांचे नुकसान झाले. दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर. वाढला असून आतापर्यंत अनेक पाळीव जनावरे त्याने मारून टाकली आहेत. त्यामुळे त्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी भाजपा जानवली विभाग अध्यक्ष राजू हिर्लेकर यांनी वनविभागाकडे केली आहे. तर तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.