मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज महावितरणचे वायरमन, लाईनमन यांचा येथील शाखा कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. आमदार नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वायरमन, लाईनमन यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार ओरसकर, माजी शहर प्रमुख नंदू गवंडी, बाबी जोगी, सन्मेश परब, मंदार केणी, पंकज सादये, उमेश मांजरेकर, भगवान लुडबे, नरेश हुले, सेजल परब, दीपा शिंदे, अंजना सामंत, रश्मी परुळेकर, आकांक्षा शिरपुटे, यतीन खोत, नीना मुंबरकर, महेंद्र म्हाडगूत, नीनाक्षी शिंदे, मंदा जोशी, नंदा सारंग, शिला गिरकर, विद्या फर्नांडिस, गणेश चव्हाण पॉली गिरकर, मोहन मराळ मनोज मोंडकर, सुरेश मडये आदी उपस्थित होते. यावेळी महावितरणचे कर्मचारी भालचंद्र वस्त, विठ्ठल रोमण, राज शिंदे, बालाजी मोरे, प्रदीप मोडक, अशोक गोलतकर, गणेश देऊलकर, ऋषी जांभवडेकर, रुपेश परब, आशीर्वाद लुडबे, सिद्धेश बांदेकर, सिद्धेश भावके, अक्षय चव्हाण, उत्तम चव्हाण, लीना परब यांचा उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भेटवस्तू, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वायरमन, लाईनमन यांचा प्रथमच सत्कार करण्यात आला. यापूर्वी आमचा असा कोणीही सत्कार केला नाही. ज्या ज्यावेळी आम्हाला समस्या भेडसावल्या त्यावेळी या पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे आम्हाला चांगले सहकार्य लाभल्याचे वायरमन यांनी यावेळी स्पष्ट केले.





