सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी विविध माध्यमांद्वारे देशभरातील लोकांबरोबर “मन की बात” या कार्यक्रमातून संवाद साधतात . नरेंद्र मोदी स्वतःची विचारधारा , देशाची प्रगती , नवोपक्रम , यशस्वी देशवासी आदी मुद्द्यांवर चर्चा करतात . आज प्रसारित झालेल्या “मन की बात” या विशेष कार्यक्रमाचे ९९ वे प्रसारण आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्ते, नागरिकांसमवेत कणकवली कलमठ येथील शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नील चिंदरकर यांच्या निवासस्थानी आस्वाद घेत पंतप्रधानांचे विचार जाणून घेतले .
यावेळी त्यांच्यासमवेत भाजप तालुका अध्यक्ष श्री.मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच श्री.संदीप मेस्त्री,जिल्हा बँक संचालक सौ.प्रज्ञा ढवण, माजी पंचायत समिती सदस्य श्री.महेश लाड, कलमठ उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते .





