कोयता गँगचा करेक्ट कार्यक्रम…!

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने मोठ्या प्रमाणात दहशत माजवली आहे. शहरातील अनेक भागात कोयता गँगकडून दहशत माजवली जात आहे. पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मोबाइल मार्केटमध्ये कोयता गँगकडून कालच दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. शहरातील कोयता टोळीला कोयता पुरवणाऱ्या कोयता विक्रेत्यावर पुणे शहर पोलीस दलाच्या युनिट एकची छापेमारी केली. या कारवाईत तब्बल १०५ कोयते पोलिसांनी जप्त केले आहेत.पोलिसांनी या प्रकरणी हुसेन राजगारा या दुकानदाराला अटक केली असल्याची माहिती मिळत आहे.