पुणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर पडला आहे. कारण, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीला होईल अशी माहिती सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “ तारीख पे तारीख तो होनेवाली है. तो त्यांचा अधिकार आहे. न्यायव्यवस्थेला कोणी, तुम्ही-आम्ही विचारू शकतो का? आपल्याकडे त्यांना(शिवसेनेला) जो अधिकार आहे तो अधिकार ते वापरणार. आम्हीपण बघतोय सारख्या तारखा सुरू आहेत. जवळपास सहा महिने झाले तारखा सुरू आहेत. आता पुन्हा फेब्रुवारीची तारीख दिलेली आहे.”





