Home महाराष्ट्र नाशिकच्या तोफखाना केंद्रात अग्निवीरांचे प्रशिक्षण सुरू

नाशिकच्या तोफखाना केंद्रात अग्निवीरांचे प्रशिक्षण सुरू

नाशिक: तरुणांमध्ये देशाच्या संरक्षण व्यवस्थेबद्दल आकर्षण निर्माण करणारी आणि देशातील बेरोजगार तरुणांना आर्थिक दृष्ट्या ही सहाय्यभूत ठरणारी अग्नीवीर योजनेची अंमलबजावणी देशातील 86 लष्करी केंद्रावर सुरू झाली असून देशभरातील तरुणांचा या योजनेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे
नाशिक जवळच्या भारतीय सैन्य दलाच्या तोफखाना केंद्रावर पहिल्या तुकडीत 2640 अग्निविरांचे प्रशिक्षण अत्यंत उत्साहात आणि जोमात सुरू झाले असून हे प्रशिक्षण सर्वसाधारणपणे 31 आठवडे चालेल अग्नी वीर योजनेअंतर्गत देशभरातून आलेल्या तरुणांना कशाप्रकारे प्रशिक्षण मिळत आहे याची माहिती देशभरातील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना देण्यात आली.
या अग्निवीरांना तोफखाना दल म्हणजे काय याची कार्यपद्धती भारतीय सैन्यात सैनिकांना कशाप्रकारे कामगिरी बजावावी लागते त्या बरोबर जंगल विविध प्रकारचे भौगोलिक परिस्थिती विविध प्रकारचे हवामान अशा वातावरणात करायच्या सैनिकी कारवाया शत्रु सैनिकांवर गोळीबार भूसुरुंग पेरलेल्या प्रदेशातील सैनिकांची कारवाई शत्रू लपलेल्या ठिकाणी तोफखान्याचा मारा करून शत्रूला नमोहरम करणे त्याचबरोबर सैनिकी जीवनातील प्रशिक्षण काळात आणि नंतर सैनिकाची एकूण दिनक्रम याबाबत एका मोटिवेशन फिल्म द्वारे नवीन आलेल्या तरुणाला माहिती दिली जाते दुसऱ्या एका कक्षामध्ये सैनिकाला सैन्याचे विविध प्रकारचे पोशाख इतर कार्यपद्धतीबद्दल माहिती दिल्यानंतर सैन्याच्या पद्धतीने त्याची केशरचना आणि वेशभूषा या संदर्भातील जीवनावश्यक साहित्य ड्रेस दिल्यानंतर नव्याने आलेल्या तरुण सैनिकाच्या अभ्यासक्रम सुरू होतो या शारीरिक सामर्थ्य टिकवून ठेवण्यासाठी सकाळी पीटी आणि विविध व्यायामापासून प्रशिक्षणार्थ सुरू होणारा दिनक्रम संध्याकाळपर्यंत सुरू राहतो तोफखाना केंद्रात येणाऱ्या प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षणाबरोबर सर्वतोपरी सुविधा मनोरंजनाची साधन आरोग्य आणि शारीरिक सामर्थ्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न होतात.

प्रशिक्षणार्थींना फिल्ड ट्रेनिंग बरोबर अत्याधुनिक संगणक प्रणाली द्वारे विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आणि प्रशिक्षणार्थी यामध्ये उत्तम नैपुण्य मिळवेल यावरती सैन्यातील अधिकारी प्रशिक्षक बारकाईने लक्ष ठेवून असतात अग्नीवीर प्रशिक्षणामध्ये सहभागी होता आल्यामुळे सैन्यात भरती होऊन शस्त्र चालविणे आधुनिक यंत्रणा हाताळणे यासारखी स्वप्न लहानपणापासून उराशी बाळगून देशसेवेची उर्मी असणाऱ्या प्रशिक्षणार्थींना अग्नी वीर योजनेमुळे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि ते समाधानी आहेत आणि भावी काळात देश सेवेसाठी सदैव तत्पर राहणार आहेत असे अग्निवीर तरुण याठिकाणी बोलून दाखवितात .