दोडामार्ग : प्रा. एम. डी. देसाई कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आणि नूतन विदयालय कळणे यांच्या सयुक्त विद्यमाने शहीद पोलीस हवालदार नितिन श्रीधर परब यांचा सातवा स्मृतिदिन विशेषाकांचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. शहीद हवालदार नितिन परब यांचा सातवा स्मृतिदिन विशेषांक प्रकाशन संस्थेचे सचिव गणपत दत्ताराम देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कळणे पोलीस हवालदार अर्जुन गवस यांच्या हस्ते करण्यात आले.
दरवर्षी नुतन विद्यालय कळणेत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. दुर्लक्षित घटकास प्रकाशझोतात आणण्याचे कार्य सस्थेचे अध्यक्ष प्रा. एम.डी. देसाई करतात. आपल्या जिल्हयातील वैदु पुढे आले पाहिजे. यासाठी त्यांनी एक आगळी वेगळी मोहीम हाती घेतली आहे. त्यानी आयुर्वेदीक औषधाचा उपचार नागरिकांनी आपल्या जीवनात सदैव चालू ठेवला पाहिजे तरच मनुष्याचे आयुर्मान वाढू शकते. आजच्या युगात पारंपरिक पद्धतीने निसर्गाच्या सान्निध्यात राहून वनौषधीचा वनस्पती शोधून आरोग्याकरिता सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहून वैदुंनी आपली संस्कृती जपलेली आहे.
मात्र, तरीही ओघवत्या काळात आपल्या देशात सुरु असलेली वनस्पती औषध परंपरा मागे पडत आहे. उलट कृत्रिम औषधाच्या माध्यमातून आलोपथी पध्दती पुढे येत आहे. त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येत आहे. आणि नैसर्गिक उपचार पद्धतीन मनुष्याचे आयुर्मान वाढविणारा वैदू दुर्लक्षित राहिला. यासाठी नूतन विद्यालायात ‘वैदू संम्मेलन ‘आयोजीत करून वैदुना प्रकाशझोतात आणण्याचे कार्य एम. डी. देसाई करत आहेत. कोरोना योद्ध्यांचा सन्मान, आरोग्य शिबिर यांसह सांस्कृतिक व सामाजिक विविध कार्यक्रम या विद्यालयात राबविले जातात.
शहीद हवालदार नितीन परब यांचा सातवा स्मृतिदिन विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी संस्थेचे सचिव गणपत देसाई, पोलिस हवालदार अर्जुन गवस, बापू नाईक आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक उमेश देसाई, प्रास्ताविक शिक्षक प्रशांत राऊळ, आभार शिक्षक विट्ठल दळवी यानी मानले.





