सावंतवाडी : सावंतवाडीत कार्यकारी अभियंता पदी अनामिका चव्हाण पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागच्या कार्यकारी अभियंता पदावर रुजू होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी चव्हाण यांची अचानक तडकाफडकी कार्यकारी अभियंता पदावरून बदली करण्यात आली होती.
चव्हाण यांची कार्यकारी अभियंता पदावरून उचल बांगडी केल्याने बदली बाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, पुन्हा एकदा कार्यकारी अभियंता पदी अनामिका चव्हाण रुजू होणार असल्याचे वृत्तमिळाले आहे.




