कुडाळ : हुमरममळा (वालावल) गावातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी दुर करण्यासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून जलमिशन योजनेतुन मंजुर झाल्याची माहिती हुमरमळा वालावल सरपंच अर्चना बंगे यांनी दीली.
यावेळी बंगे यांनी सांगितले कि हुमरमळा वालावल गावासाठी रस्ते, विज, पाणी, मोबाईल टॉवर अशा माध्यमातुन खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी कोटृयावधी रुपयांचा निधी दीला तसेच लोकांच्या जिवनमानाचा महत्वाचा विषय पाणी यासाठी समर्थनगर पंधरा लाख, पारकरवाडी रस्त्यालगत घरे यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे दहा लाख, पडोसवाडी गुंजकरवाडी नळपाणी योजना बारा लाख, करमळीवाडी सचिन पेडणेकर यांच्या घराजवळ पंधरा लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला असुन, पाणी हा महत्त्वाचा विषय खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी अतुल बंगे यांच्या मागणी नुसार आणि उपसरपंच स्नेहल सामंत, ग्रामपंचायत सदस्य कांता माड्ये, ग्रामपंचायत सदस्या रमा गाळवणकर, ग्रामपंचायत सदस्या सौ सोनाली मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ गिरीजा गुंजकर, ग्रामपंचायत सदस्या शिल्पा मयेकर, ग्रामपंचायत सदस्य अमृत देसाई यांची मागणी होती त्यानुसार प्रत्येक वार्डामध्ये समान निधी मिळाला असल्याचे बंगे यांनी सांगितले.





