सावंतवाडी : शिमगा! कोकणी माणसाचा हक्काचा असा सण. खरं सांगायचं झालं तर प्रत्येकाचा स्वत:चा असा सण. याच सणाची कोकणी माणसं वर्षभर एखाद्या ‘चकोरा’प्रमाणं वाट पाहत असतात. वर्षातून एकदा देव घरी येणार ही कल्पनाच वर्षभर जगण्यासाठी बळ देते. नवी उमेद देते. त्याचं कारण असं आहे कि कोकणी माणसं कामानिमित्त जगाच्या पाठीवर असतत. जगात तुम्ही कुठंही जा तुम्हाला एक तरी कोकणी माणूस नक्की दिसणार. वर्षभरात असलेले कामाचे व्याप, ताण, क्षीण या गोष्टी सर्वांना ठावूक आहेत.
आता कोकणात ५, ७, ९ अशा दिवसांच्या होळीची सांगता होत आहे. आज मळेवाड गावातील नवव्या दिवशीची धूळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीय. यामध्ये लहान मुलांपासून थोड्या मोठ्यांपर्यंत सर्वांचा मोठा सहभाग होता. यामुळे गावात एक उत्साहपूर्ण वातारवण होत.





