देवगडमध्ये संपाला उत्स्फूर्त पाठिंबा…!

71

देवगड : २००५ प्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी याप्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी देवगड येथील राज्य तसेच जिल्हा परिषद कार्यरत सर्व सहवर्गाचे कर्मचारी संघटना यांनी पंचायत समिती परिसरात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जोरदार निदर्शने केली.

देवगड तहसील मध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचारी वर्गाने देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून या संपाला पाठिंबा दिलेला आहे. देवगड पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर जवळपास 50 संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत या शिक्षकांच्या संपाला व त्यांच्या असलेल्या विविध मागण्यांना पाठिंबा दिला आहे.