जेवण दिलं नाही याचा होता राग | आई – भावाला त्याने केलं ठार | बापर्डे खून प्रकरण

72

देवगड : देवगड तालुक्यातील बापर्डे बौद्धवाडी येथिल भरत मुरारी सकपाळ (५०) याने आपल्या आई व भावाची हत्या जेवण देत नसल्याने केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भरत मुरारी सकपाळ रा बापर्डे बौद्धवाडी याला दारूचे व्यसन होते.त्यामुळे त्याचे घरात आई व भाऊ यांच्या बरोबर वाद होत होते.सोमवारी त्याला रात्री त्याला घरी जेवन न दिलेमुळे त्याने रात्री गाढ झोपेत असताना आई शोभा सकपाळ (७५) व मोठा भाऊ महेंद्र सकपाळ (५५)यांच्या तोंडात चुलीतील राख भरून दांड्याने ठेचून त्यांचा निर्घृणपणे खून केला.तसेच चेहऱ्यावर पूर्ण राख फासून चेहरा विद्रुप करून टाकला.भरत त्याने खून आपण केल्याची कबुलीही पोलिसांना दिलीं आहे.पोलिसांनी त्याला अटक केली असून देवगड पोलीस स्टेशन मध्ये आणले असून त्याला देवगड न्यायालयात हजर करणार आहेत.
यापूर्वी ही भरत याने २००७ आपल्या बायकोची ही हत्या डोक्यात हेल्मेट घालून केली होती .त्याची शिक्षाही त्याने भोगली होती.आता तर त्याने जन्मदात्या आईचीच व सख्या मोठा भाऊ यांची झोपेत असताना डोक्यात दांडा मारून आरोपीने
त्यांना जागीच ठार केल्याने देवगड तालुक्यात खळबळ माजली आहे.घटनास्थळी पोलिसांनी रीतसर पहाणी करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणले आहेत.