मळेवाड मोंडेवाडी – पावणाई नळ योजनेचं नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन…!

224

देवगड : पावणाई गावातील नळ योजनेसाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सुमारे 68 लाख रुपये मंजूर झाले आहेत या कार्यक्रमाची भूमिपूजन आमदाराने नितेश राणे यांच्या हस्ते आज करण्यात आले जलजीवन मिशन या कार्यक्रमातून या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे तसेच मळेवाड मोंडेवाडी येथील मळेगाव अनुभवणेवाडी या दोन वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

जलजीवन मिशन मधून या कामाला मंजूर मिळाली आहे. ग्रामपंचायत निवडणुका सुरू असताना आमदार नितेश राणे यांनी या दोन्ही वाड्यांना पाण्याचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, तालुकाध्यक्ष डॉ अमोल तेली, बापर्डे सरपंच संजय लाड, गावचे सरपंच , माजी जिल्हा परिषद सदस्य अनघा राणे,अजित राणे आदि उपस्थित होते.