अमरावतीतील गटविकास अधिकारी – सरपंचांसह टीमची बापर्डे गावाला भेट…!

121

देवगड : देवगड तालुक्यातील बापर्डे गावाच्या अभ्यास दोऱ्यासाठी अमरावती जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, सरपंच,तसेच ग्रामसेवक अश्या 30 जणांनी भेट दिली.या अभ्यास दौऱ्यात बापर्डे गावामध्ये आतापर्यत झालेल्या कामाची माहिती घेतली. गावातील केलेल्या कामाची कोणत्या प्रकारे नियोजन केले व गावातील ग्रामस्थांनी याबाबतीत कोणत्या प्रकारचे सहकार्य केले याबाबत माहितीही जाणून घेतली. डॉ,सुहास राणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून सुरू असलेल्या यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय याबाबत सविस्तर विवेचन केले,,तसेच डॉ सुहास राणे यांच्याच प्रयत्नातून डॉ सुधाजी मूर्ती मॅडम तसेच डॉ प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा शाळेतील मुलांनी गावाला दिलेली भेट आमच्या या गावाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखे आहे असेही ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी यावेळी सांगितले,,तसेच गावाला मा भास्करराव पेरेपाटील यासारख्या मान्यवरांच्या भेटी होत असल्याचे सांगितले.

सदर अभ्यास दोऱ्यात अमरावती टीमने बापर्डे गावाला भेट दिल्यावर खूप काही शिकता आले व याप्रकारची कामे आम्ही आमच्या गावात राबविण्याचे प्रयत्न करू असे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. बापर्डे ग्रामसेवक श्री शिवराज राठोड यांनी आपले व बापर्डे गावचे सरपंच संजय लाड यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अतुल राणे,रुपेश मोडकर,ज्योती नाईकधुरे,सोसायटी चेअरमन अजित राणे,संदीप नाईकधुरे,जीवन नाईकधुरे , ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील इतर मान्यवर उपस्थित होते.