खारेपाटण विभागात ठाकरे सेनेला भगदाड…! | वाचा कोणी केला प्रवेश

118

कणकवली : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर शिवसैनिक खारेपाटण गावचे सुपुत्र तथा डोंबिवली येथील उद्योजक रुपेश सावंत यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, माजी खा. सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली येथे शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. कणकवली येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात सावंत यांनी पक्षप्रवेश केला. उद्योजक रुपेश सावंत यांचा पक्षप्रवेश हा खारेपाटण विभागात शिवसेनेला उभारी देणारा तर ठाकरे सेनेला मोठा धक्का मानला जात आहे. खारेपाटण विभागात अडीचशे हुन अधिक महिलांना मार्लेश्वर, गणपतीपुळे सहल घडवीत मोफत देवदर्शन ची सोय रुपेश यांनी स्वखर्चाने करून दिली होती.

खारेपाटण विभागात होत असलेल्या प्रत्येक सामाजिक कार्यात रुपेश यांचा नेहमीच आर्थिक सहकार्याचा हात असतो. खारेपाटण विभागात कोव्हीड काळात कोव्हीड केअर सेंटर ला लाखोंचा निधी त्यांनी दिला होता. धार्मिक, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात नेहमीच निःस्वार्थीपणे सहकार्य करणारे अग्रणी व्यक्तीमत्व म्हणून रुपेश सावंत यांची ओळख आहे. रुपेश सावंत यांच्या पक्षप्रवेशाने खारेपाटण विभागातील शिवसेनेला बूस्टर डोस मिळाला आहे.