१० ते २२ मार्च कालावधीत कणकवलीत ‘रोटरी आनंद मेळा’…!

कणकवली : रोटरी क्लब कणकवलीतर्फे रोटरी आनंद मेळा आयोजित करण्यात आला असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर १० ते २२ मार्च या कालावधीत ‘रोटरी आनंद मेळा भरणार आहे. यानिमित्त विविध स्पर्धा व संगीत रंजनीचा कार्यक्रम होणार आहे. या मेळ्याचे उद्घाटन शुक्रवार १० रोजी सायंकाळी ६ वा. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी रोटरीचे गव्हर्नर व रोटरीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती रोटरी क्लबच्या अध्यक्षा वर्षा बांदेकर व आनंद मेळ्याचे इव्हेंट मॅनेजर रोटरी क्लब कणकवलीतर्फे रोटरी आनंद मेळा आयोजित करण्यात आला असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर १० ते २२ मार्च या कालावधीत ‘रोटरी आनंद मेळा भरणार आहे.यानिमित्त विविध स्पर्धा व संगीत रंजनीचा कार्यक्रम होणार आहे. या मेळ्याचे उद्घाटन शुक्रवार १० रोजी सायंकाळी ६ वा. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी रोटरीचे गव्हर्नर व रोटरीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती रोटरी क्लबच्या अध्यक्षा वर्षा बांदेकर व आनंद मेळ्याचे इव्हेंट मॅनेजर ॲड. दीपक अंधारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.कणकवली येथे पत्रकार परिषद घेत रोटरी आनंद मेळाबाबत माहिती देण्यात आली यावेळी रोटरी क्लबच्या उपाध्यक्ष उमा परब, खजिनदार माधवी मुरकर, मेघा गांगण,सीताराम उर्फ दादा कुडतरकर, अनिल कर्पे, गुरु पावसकर, रवी परब, नितीन बांदेकर, धनंजय कसवणकर, दीपक बेलवलकर आदी उपस्थित होते.