१० मार्च रोजी हळवल येथे साजरा होणार शिवजयंती उत्सव | शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली : दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शिवजयंती उत्सव मंडळ हळवल यांच्यावतीने १० मार्च २०२३ रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच वेगवेगळे कार्यक्रम देखील या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत. १० मार्च २०२३ रोजी सकाळी ९:३० वा. शिवप्रतिमेचे पूजन, दुपारी १२:०० वा. सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ७:०० वा. हरिपाठ, रात्रौ ८:३० वा. मान्यवरांचा सत्कार व आदर्श व्यक्तिमत्व विकास पुरस्कार वितरण , ९:०० वा. श्री. मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे तालुका कुडाळ यांचा दशावतार नाट्य प्रयोग, असे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सर्व शिवभक्तांनी अंक शिवप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी विनंती शिवजयंती उत्सव मंडळ हळवल यांच्यावतीने करण्यात आली आहे.